केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेची आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीसोबत आंतरराष्ट्रीय बैठक

कापूस

मुंबई (निवासी संपादक सुभाष आरोसकर) : भारतीय कृषी संशोधन परिषद च्याकेंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई यांनी 22 ऑगस्ट 2023 रोजी संस्थेत आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती(आय.सी.ए.सी.), वॉशिंग्टन डीसी, अमेरिकायांच्या अधिकार्‍यांसह एक आंतरराष्ट्रीय बैठक आयोजित केली होती.

 

या कार्यक्रम वेळी, संस्थेचे संचालक डॉ. एस. के. शुक्ला यांनी कार्यक्रमयाचे समन्वयन केलेआणि संस्थेच्या प्रमुख उपलब्धी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर सादर केल्या. आय.सी.ए.सी.ही जागतिक कापूस उत्पादक, उपभोग आणि व्यापार करणार्‍या देशांतील सदस्यांची संघटना आहे ज्याचा उद्देश कापूस आणि कापड समुदायाला प्रोत्साहन, ज्ञानाची देवाणघेवाण, नावीन्य, भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या कापूस समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणे आहे.

 

आय.सी.ए.सी.चे कार्यकारी संचालक श्री. एरिक ट्रॅचटेनबर्ग यांनी कापूस संशोधन क्षेत्रात अत्याधुनिक संशोधन केल्याबद्दल केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधनसंस्थेचे अभिनंदन केले आणि संस्थेच्या शास्त्रज्ञांना आय.सी.ए.सी.च्या विविध उपक्रमांमध्ये सहकार्य करण्यासाठी आमंत्रित केले. आय.सी.ए.सी.चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. के.आर. क्रांती यांनी कापूस उद्योग आणि आय.सी.ए.सी.च्या जगभरातील अग्रगण्य उपक्रमांद्वारे समृद्धीकडे पाहण्याचा दृष्टीकोन विशद केला.

 

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेत 6 ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत होणार्‍या “नवव्या आशियाई कापूस संशोधन आणि विकास नेटवर्क (ACRDN) मीटिंग आणि आंतरराष्ट्रीय परिषदच्या आयोजनाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला संस्थेचे माजी संचालक डॉ.ए.जे. शेख, माजी सल्लागार डॉ. संध्या क्रांती, आय.सी.ए.सी., संस्थेचे शास्त्रज्ञ आणि तांत्रिक अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here