नैसर्गिक विधीसाठी शेतात गेलेल्या महिलेवर अत्याचार

rape
file photo

अहमदनगर (प्रतिनिधी) : नैसर्गिक विधीसाठी शेतात गेलेल्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (दि. ५) सायंकाळी नगर तालुक्यातील एका गावात घडली. अत्याचार करून पीडित महिलेला मारहाणही केली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी पीडित महिलेने याप्रकरणी गुरूवारी (दि. ७) नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून राहुल भिकाजी भोसले (रा. गुंडेगाव ता. नगर) याच्याविरूध्द गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी फिर्यादी नैसर्गिक विधीसाठी एका शेतात गेल्या होत्या. त्याच वेळी भोसले हा त्यांच्या पाठीमागे गेला व त्याने फिर्यादीवर अत्याचार केला.

फिर्यादीने प्रतिकार केला असता त्यांना मारहाण करण्यात आली. झालेला प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुला जिवे सोडणार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान, फिर्यादीने झालेला प्रकार त्यांच्य सासर्‍याला सांगितला. त्याचा भोसले याला राग आल्याने त्याने कुर्‍हाडीच्या दांडक्याने मारहाण केली. फिर्यादीचे सासरे मध्ये आले असता भोसले याने त्यांना देखील मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here