मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सुटले…मात्र ‘साखळी उपोषण’ सुरुच राहणार

manoj-jarange

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जारंगे पाटील. यांनी गेल्या १५ दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू होते,त्यांची प्रक्रुती अंत्यंत खालावत चालली होती, संपूर्ण मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा जिव टांगणीला लागला होता, घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री ना, एकनाथ शिंदे यांनी साथि मंत्र्यांना बरोबर घेऊन भेट देऊन समाज बांधवांच्या भावना समजून घेतल्या,समाज बांधवांच्या तिव्र भावनांची कदर करून समस्त मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी व माझे सरकार अहोरात्र प्रयत्न करीत आहे, असे म्हणत एक महीन्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले, आमरण उपोषण सोडताना जरांगे पाटलांनी तब्येतीची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

 

मराठा आरक्षणासाठी अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरबत घेऊन, उपोषण सोडले असले तरी साखळी उपोषण सुरुच राहणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकारने नियुक्त केलेल्या समितीला अहवाल देण्यासाठी वेळ लागणार आहे. तसेच सरकारला मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठीही काही अवधी लागत होता. सरकारने वेळोवेळी तशी विनंती केली होती. त्यानंतर काही अटी शर्तीच्या अधीन राहून मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले. त्यांनी एक महिन्याचा अवधी सरकारला दिला आहे. एक महिन्याचा वेळ देत असताना, शासनाकडे मनोज जरांगे यांनी एक अट ठेवली होती. उपोषण सुटेल परंतु, या ठिकाणी साखळी उपोषण हे सुरूच राहणार. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ठाण मांडून राहणार असल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली होती.

 

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या शिष्ट मंडळा समोर त्यांनी सरकारला वेळ देतो, उपोषण सोडतो मात्र महिनाभर साखळी उपोषण सुरुच ठेवणार, अशी भूमिका ठेवली होती. ती सरकारने मान्य केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जरांगे यांनी उपोषण सोडले असले तरी साखळी उपोषण सुरुच राहणार असल्याने सरकारवर दबाव कायम राहणार आहे.

 

यावेळी महाराष्ट्रातील असंख्य मराठा तरुण आमरण उपोषण स्थळी जमा झाले होते, विविध प्रकारच्या घोषणा देऊन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून. उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी उपोषण स्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here