नैताळे येथील सरणावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाची सांगता…

naitale-uposhan
मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडल्यानंतर नैताळे येथे उपोषण कर्ते वाल्मीक बोरगुडे यांना लिंबू पाणी पाजून उपोषण सोडताना प्रणव पवार ,राजेंद्र डोखळे, राजेंद्र बोरगुडे संजय बोरगुडे ,दादा बोरगुडे,इत्यादी

प्रणव पवार व राजेंद्र डोखळे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन सोडले उपोषण

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या सतरा दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले होते त्यांच्या समर्थनार्थ नैताळे येथील वाल्मीक बोरगुडे यांनी सुरू केलेल्या सरणावरील आमरण उपोषणाची आज ( दि. १४ )रोजी पाचव्या दिवशी प्रणव दादा पवार व राजेंद्र डोखळे यांचे हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली

गेल्या सतरा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंतरवाली सराटी या गावी आमरण उपोषण सुरू केले होते त्यांच्या समर्थनार्थ नैताळे येथील वाल्मीक बोरगुडे यांनी सरनावर बसून दिनांक १० सप्टेंबर रोजी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर परिसरातील मराठा समाजाच्या तरुणांनी घरोघरी जाऊन एक गौरी एक लाकूड गोळा करून नैताळे ग्रामपंचायतीसमोर सरण रचले होते वाल्मीक बोरगुडे यांनी प्रत्यक्षरीत्या उपोषणा सुरू केल्यानंतर आज पाचव्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, महिला विद्यार्थी अशा सुमारे पंधरा ते वीस हजार समर्थकांनी उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेटी देऊन समर्थन दिले होते.

 

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू केलेले वाल्मिक बोरगुडे यांचे सरणावरील आमरण उपोषणास सर्व समाजाचा आम्हाला जिल्हाभरातून व जिल्ह्याच्या बाहेरुन उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल शासनाच्या पोलीस, महसूल ,व ग्रामविकास विभागाचे वेळोवेळी उपोषण कालावधीत सहकार्य लाभले
राजेंद्र बोरगुडे
प्रवक्ते- मराठा समाज आरक्षण समिती नैताळे

जिल्ह्यातील असंख्य ग्रामपंचायत सामाजिक संस्था यांनी पाठिंबाचे पत्र दिले होते तर नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षदा सानप डॉक्टर शुभम निकुंभ ,डॉक्टर रोहित धोक्रट डॉक्टर ,नितीन धारराव ,डॉक्टर हेमंत मंडलिक, डॉक्टर दिलीप कुमावत, डॉक्टर जाधव ,डॉक्टर योगेश परदेशी ,यांनी त्यांच्या आरोग्य पथकासह वेळोवेळी उपोषण स्थळी भेटी देऊन उपोषणकर्त्याची आरोग्याची तपासणी करून त्याबाबतची काळजी घेतली.

 

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ नाशिक जिल्ह्यातील नैताळे गावातील नागरिकांनी प्रथम सहभाग घेऊन समाजाच्या दृष्टीने गौरवस्पद कामगिरी केली उपोषणकर्ते वाल्मिक बोरगुडे यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी.
प्रणव दादा पवार नाशिक

उपोषण कालखंडातील पाचही दिवस निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पटारे ,हवालदार खरात, विलास बिडगर, इत्यादींनी कोणत्याही प्रकारची शांतता बिघडू न देता चोख बंदोबस्त ठेवला होता शाशनाचे प्रतिनिधी म्हणून तलाठी शंकर खडांगळे पाचही दिवस उपोषण स्थळी थांबून शासनाला वेळोवेळी माहिती देत होते तर पाचही दिवस गावातील भजनी मंडळ तसेच धारणगाव खडक गाजरवाडी येथील गोंधळी यांनी आपले कार्यक्रम करून उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला उपोषणाच्या सांगता प्रसंगी संजय बोरगुडे ,राजेंद्र बोरगुडे ,दादा बोरगुडे ,रतन बोरगुडे, नवनाथ बोरगुडे, महेश पठाडे ,रामकृष्ण दराडे ,सुभाष कराड, दत्तू भवर ,अमोल भालेराव, सदाशिव कोटकर, नितीन मोगल, शिवा सुराशे ,राहुल बोरगुडे, दिलीप घायाळ,विजय बोरगुडे, सुनील बोरगुडे, चिंतामण देवरे, अरविंद बोरगुडे, सोपान बोरगुडे ,राजू पठाण ,जगन पाठक ,रवींद्र बोरगुडे, नवनाथ बोरगुडे, अरुण घायाळ, शंकर घायाळ ,पुंजाराम फडे,नवनाथ जाधव, देविदास बोरगुडे, बापू बोरगुडे, योगेश बोरगुडे, राजेंद्र घायाळ ,नित्यानंद बोरगुडे ,शांताराम डावखर इत्यादी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here