ग्राहक चळवळ सक्षम करण्यासाठी विद्यालयामध्ये होणार विद्यार्थी क्लब स्थापन; दिलीप निंबाळकर याचा ठराव

ग्राहक चळवळ

पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमिला टेमगिरे) : ग्राहक चळवळ सक्षम करण्यासाठी निस्वार्थी व निपाक्षपातीपणे काम करणाऱ्या नवतरुण कार्यकर्त्यांची आवश्यकता असल्याने पुणे जिल्ह्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात विद्यार्थी ग्राहक क्लब स्थापन करणारअसल्याचे प्रतिपादन “अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप निंबाळकर “यांनी पारगाव शिंगवे येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.

पारगाव शिंगवे येथे नुकतीच अखिल भारतीय ग्राहक पंचायत आंबेगाव तालुका व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने” विद्यार्थी ग्राहक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून अखिल भारतीय ग्राहक पंचायत महाराष्ट्र सहसंघटक रमेश टाकळकर यांनी केले,

ग्राहक चळवळयावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्री शत्रुघ्न थोरात हे अध्यक्ष स्थानी होते तसेच व्यासपीठावरती पुणे जिल्हा सहसचिव नितीन मिंडे, महिला अध्यक्षा वैशाली अडसरे, जिल्हा महिला सचिव शिल्पा आडसरे, आंबेगाव तालुका अध्यक्ष सुभाष मालकर, महसूल समिती प्रमुख कैलास मावकर ,ज्येष्ठ नागरिक विभाग प्रमुख ज्ञानेश्वर थोरात गुरुजी, कुंडलिकराव थोरात, संतोष थोरात ,सदाशिव थोरात ,राजू गोडसे आदी मान्यवर होते

यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष निंबाळकर म्हणाले की ग्राहक चळवळ सक्षम झाल्याशिवाय ग्राहकांचे शोषण थांबणार नाही परंतु त्यासाठी राजकारणापासून दूर राहून काम करणारे कार्यकर्ते उभे करण्या साठी महाविद्यालय युवक व युवतींना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, यामध्ये किराणा ,प्रवास, डॉक्टर हॉस्पिटल, पेट्रोल सोने खरेदी त्यादी ठिकाणी कशी पासून केली जाते व ती कशी टाळावी याचे पद्धतशीरपणे प्रशिक्षण देण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने पुढाकार घेतला असून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये याची प्रॅक्टिकल प्रशिक्षण देण्या साठी विद्यार्थी ग्राहक क्लब ची पुणे जिल्ह्यात स्थापना करण्याचे उद्दिष्ट अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने हाती घेतले आहे, आज पर्यंत इंदापूर शिरूर बारामती हवेली जुन्नर राजू नगर इत्यादी तालुक्यामध्ये विद्यार्थी ग्राहक किंवा ची स्थापना करण्यात आली असून इतरही तालुक्यामध्ये लवकरात लवकर स्थापना करण्यात येईल असे निंबाळकर यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here