मुंबई (संपादक सुनिल पाटील) : अखिल भारती. किसान काँग्रेसच्या राष्ट्रीय सह संयोजकपदी ॲड. जीवनदत्त आरगडे यांची नुकतीच निवड करण्यात आली. दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात ॲड. जीवनदत्ता आरगडे यांची नियुक्ती करुन, त्यांच्याकडे तेलंगणा राज्य अतिरिक्त प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
याबाबतचे लेखी आदेश अध्यक्ष सुखपालसिंग खैरा यांच्या मान्यतेने राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिलेश शुक्ला यांनी दिला. याबाबत जीवनदत्त आरगडे यांनी अखिल भारतीय किसान काँग्रेस चेअरमन तथा पंजाब विधानसभा विरोधी पक्षनेते आमदार सुखपालसिंग खैरा, राष्ट्रीय नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिलेश शुक्ला, महाराष्ट्र किसान काँग्रेस प्रभारी प्रकाश घाले तसेच महाराष्ट्र प्रदेश किसान कॉंग्रेस उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रभारी सुनिल पाटील यांचे आभार मानले.







