विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराथमधून आलेली हवालाची ४२ लाखांची रोकड जप्त, दोघांना अटक

sangmer-police

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमधून हवालामार्गे पैसा आल्याप्रकरणी अहिल्यानगर पोलिसांनी गुजरातमधील दोन भामट्य़ांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ४२ लाखांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुकेशकुमार रमेशभाई पटेल, धवलकुमार जसवंतभाई पटेल या दोघांना ताब्यात घेतले असून, ते गुजरातमधील गोठवा इथले आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.

 

संगमनेर शहरातील पार्श्वथान गल्लीत ४२ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कमेसह पोलिसांनी गुजरात राज्यातील दोघांना ताब्यात घेतलं आहे. संगमनेर शहरातील पार्श्वथान गल्लीत लाखो रुपये बेकायदेशीर येणार असल्याची माहिती अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथक तयार केले आणि संगमनेर इथं सापळा रचला. त्यानंतर काही साध्या वेशात तर काही वर्दीवर असणार्‍या पोलिसांना पार्श्वथान गल्लीतील सहदेव ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर दोन व्यक्तींना काही बॅगासह १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ताब्यात घेतलं.

 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गुजरातमधील गोठवा इथल्या मुकेशकुमार रमेशभाई पटेल, धवलकुमार जसवंतभाई पटेल यांच्याकडं असलेल्या बॅगची तपासणी केली. या बॅगमध्ये तब्बल ४२ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आली. ही रक्कम हवाल्याची असून याचा मालक हा संगमनेर इथला भावेश रामाभाई पटेल आणि अहिल्यानगर इथला आशिष सुभाष वर्मा हे दोघं असल्याचं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांनी सांगितलं. “पोलिसांनी याप्रकरणात संशयित असणार्‍यांना ताब्यात घेतलं आहे. ही रक्कम कुठून आली, त्याचा मालक आणखी कोण आहे. या गावात आणखी किती वेळा हवाला झाला आहे. याचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत,” अशी माहिती अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here