इस्रायल सैन्यानं हमासचा म्होरक्या याह्या सिनवर याचा केला खात्मा

yaha-sinver

जेरुसलेम : इस्रायलच्या सैन्यानं हमासचा म्होरक्या याह्या सिनवर याचा खात्मा केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. इस्रायलवर ७ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हा याह्या सिनवर असल्याचा दावा इस्रायलच्या सैन्यानं केला. याह्या सिनवर याचा खात्मा करण्यात आल्याच्या वृत्ता इस्रायली सैन्याचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी दुजोरा दिला आहे. हमासचा म्होरक्या मारला गेला असला, तरी आमचं काम अद्यापही पूर्ण झालं नाही. आम्ही आमच्या सगळ्या ओलिसांना घरी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं आयडीएफचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

 

 

इस्रायली सैन्यानं हमासचा म्होरक्या याह्या सिनवर याचा खात्मा केला. मात्र अद्यापही आमचं काम पूर्ण झालं नसल्याचा दावा आयडीएफ प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी वृत्तसंस्थेला बोलताना सांगितलं. यावेळी बोलताना आयडीएफ प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की, “७ ऑक्टोबरच्या हत्याकांडाला हमास दहशतवादी संघटनेचा म्होरक्या याह्या सिनवार हा जबाबदार होता. त्यामुळे इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात याह्या सिनवर याचा मृत्यू झाला आहे. आमचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. आम्ही आमच्या सर्व ओलिसांना घरी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. इस्रायलच्या नागरिकांच्या रक्षणासाठी आम्ही मिशन पूर्ण होईपर्यंत काम करू.

यावेळी बोलताना आयडीएफ प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितलं की, गाझामधील हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला. तेव्हा या दहशतवाद्यांनी इस्रायली नागरिकांची घरात घुसून हत्या केली. महिला, मुलींवर बलात्कार केले. संपूर्ण कुटुंबांना जिवंत जाळलं. हमासच्या दहशतवाद्यांनी तब्बल २५० पेक्षा अधिक इस्रायली नागरिकांना ताब्यात घेऊन बंधक बनवलं. इस्रायलवरील सगळ्यात क्रूर हल्ल्यासाठी याह्या सिनवर हा जबाबदार होता. अद्यापही 101 नागरिक गाझामध्ये बंधक आहेत. त्यामुळे आम्ही याह्या सिनवरला शोधून काढून आम्ही त्याचा खात्मा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here