गुंतवणुकीवर गाळे देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांनी केली सहा जणांची ६५ लाखांची फसवणूक

crime
File Photo

पुणे (क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे): बांधकाम व्यवसायात पैसे गुंतविल्यास तयार होणार्‍या इमारतीत व्यावसायिक गाळे देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांनी सहा जणांची ६५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे इतर ५ नातलग यांना आरोपी यांनी संगनमत करुन आरोपीचे बांधकाम व्यवसायात पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यातून येणार्‍या उत्पन्नातून बांधकाम व्यवसायात तयार होणाऱ्या इमारतीतील व्यावसायिक गाळे किंवा निवासी गाळे कायम स्वरुपी खरेदीने देण्याचा प्रस्ताव दिला. फिर्यादी व त्यांच्या ५ नातलगांनी ६५ लाख ५० हजार रुपये गुंतविले. त्यानंतर त्यांना व्यवसायिक गाळे किंवा निवासी गाळे न देता, त्यांची फसवणूक केली. त्यांनी पैसे परत मागितल्यावर आरोपींनी वेगवेगळ्या बँकेचे धनादेश दिले. मात्र, खात्यात पैसे नसल्याने ते धनादेश परत आले.

 

फिर्यादी हे पैसे मागण्यास गेले असता फरहाना कुरेशी या दुसरीकडे राहण्यास गेले असून त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर याबाबत मेहबुब अब्दुलगनी शेख (वय ६८, रा. कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फरहानाझ सादीक कुरेशी आणि हिना सादीक कुरेशी (दोघी रा. भिमपुरा, कॅम्प) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ८ एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गुजर तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here