तळेगाव दाभाडे पोलिसांनी केला विक्रीसाठी आणलेला अडीच लाखांचा गांजा हस्तगत

ganja
file photo

पुणे (क्राइम रिपोर्टर प्रशांत महाजन) : ‘मुंबई – पुणे एक्सप्रेस-वे’ कडे जाणार्‍या रोडवर विक्री करण्यासाठी आलेल्याकडून पोलिसांनी अडीच लाख रुपयांचा ५ किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अश्फाकअली सज्जाद अली शेख (वय ४०, रा. न्यू गौतमनगर, देवनार पोलीस चौकी बीट क्रमांक २ चे समोर, गोवंडी वेस्ट) याला अटक केली आहे.

 

याबाबत पोलीस अंमलदार उमाकांत विष्णु नवगिरे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस गस्त घालत असताना त्यांना गांजा विक्रीसाठी एक जण येणार असल्याची बातमी मिळाली.

 

त्यानुसार पोलिसांनी सोमटणे फाटाकडून मुंबई -पुणे एक्सप्रेसवेकडे जाणार्‍या रोडवर आदित्य हॉटेलसमोर सापळा रचला. तेथे संशयास्पदरित्या थांबलेल्या अश्फाकअली शेख याला पकडले. त्याच्याकडून अडीच लाख रुपयांचा ५ किलो गांजा जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक खामगळ तपास करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here