राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कबनूर शहरतर्फे विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीपत्र वाटप

kabnur-NCP

कोल्हापूर (प्रतिनिधी सतीश चव्हाण) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कबनूर शहरतर्फे विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीपत्र वाटप दिनांक १८/१०/२०२४ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विठ्ठलराव चोपडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोकराव पाटील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कबनूर शहर हे होते.

 

या कार्यक्रमाला श्रीकांत कांबळे, तोफिक मुजावर, जाफर मुजावर, संजय गोसावी, रवी कांबळे, निशिकांत पाटील, सुनील इंगवले, अनिल पाटील, प्रा अशोक कांबळे सर आदींची प्रमुख उपस्थिती होती. श्री विठ्ठल मंदिर कबनूर येथे कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कबनूर शहराच्या वतीने करण्यात आले होते. प्रथम कबनूर शहराध्यक्ष राहूल कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक करुन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

कबनूर शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली दगडू उर्फ कृष्णा कुंभारउपाध्यक्ष, बबन इंगळे सचिव, खजिनदार ‌ नजीर मुल्ला यांच्या निवडी करण्यात आल्या. कबनूर शहर महिला अध्यक्षपदी सौ.मालन माने, युवक अध्यक्षपदी विजय पाटील, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्षपदी कबीर हजारी, भटके विमुक्त जाती आघाडी अध्यक्ष बाळासो सकट, सामाजिक न्याय आघाडी अध्यक्ष प्रवीण बोरवले यांच्या नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.

 

त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकारी बबन इंगळे, निशिकांत पाटील, दगडू उर्फ कृष्णा कुंभार, अनिल पाटील, कबीर हजारी, सुनील इंगवले, अक्षय गुरव, अॅड.संग्राम नळंदेकर, सुरज सुतार, तारा कांबळे, डॉ असिफ फकीर, मुझमिल मुजावर यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कबनूर गावातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आप्पासाहेब वाघमारे व बबन इंगळे यांनी केले.अनिल पाटील यांनी शेवटी आभार मानून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here