अंबरनाथमध्ये दोन पिस्तुल, २५ राऊंड व एक चाकू सह दोन आरोपींना अटक

ambarnath-police

ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : निवडणुक आयोगाने दिलेल्या सुचनांप्रमाणे अवैध शस्त्रांबाबत शोध मोहिम राबविणे संदर्भात मा.पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे सर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई करीत असताना, अंबरनाथ पोलीस स्टेशन गु र नं कलम 1299/2024 भारतीय न्याय संहिता कलम 115 (2),352, (3), 3 ( 5 ) सह शस्त्र अधिनियम कलम 4, 25 प्रमाणे दाखल गुन्ह्यात फिर्यादी सुरेश देवेंद्र सिंग यांनी आरोपी 1 ) कल्पेश पाटील 2 ) दिग्विजय पिसाळ व इतर यांनी हाताने मारहाण करुन पिस्टल व तलवार सारखे हत्यारे दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असले बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध सुरु असताना आज रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे सपोनि/ भालेराव व तपास पथकाचे टीम ने जांभुळगाव वीट भट्टी या ठिकाणी छापा घालून आरोपी नामे 1 ) दिग्विजय अमर पिसाळ, रा. जांबुळ व 2 ) नरेंद्र संजय घरत, रा. बदलापूर याना ताब्यात घेऊन त्यांचे कडून 1) दोन देशी बनावटीचे पिस्टल 2) दोन जिवंत राऊंड 3 ) 23 राउंड चे अर्धवट पुढील भाग 4) एक चाकू 5) दोन दुचाकी मोपेड वाहन असे पंचनामा करून जप्त करण्यात आले आहेत

 

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, श्री. डुंबरे सर यांनी दिलेल्या सुचना व निर्देशा प्रमाणे सहआयुक्त श्री. चव्हाण सर, अप्पर पोलीस आयुक्त, श्री.संजय जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 4, श्री. सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अमोल कोळी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ पोलीस ठाणे बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे किशोर शिंदे, सपोनि/ संदीप भालेराव, पोउनि /मुंडे व डीबी पथकातील अंमलदार सचिन जाधव, संजय चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, नागेश परदेशी यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here