३ वर्षाच्या मुलीवर नातेवाईकाकडूनच बलात्कार

बलात्कार
file photo

तिरुवनंतपुरम (आंध्रप्रदेश) : येथे ३ वर्षाच्या मुलीवर तिच्या नातेवाईकानेच बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आंध्रप्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यातील वदमलपेट परिसरात ही घटना घडली आहे . याप्रकरणी २२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. मुलीच्या जवळच्या नातेवाईकाने तिला चॉकलेट देत फूस लावली आणि तिला घराजवळच्या मोकळ्या जागेत घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता त्याने तिचा मृतदेह देखील जमिनीत पुरला. पोलिसांनी २२ वर्षीय आरोपी सुशांतला बेड्या ठोकल्या आहेत. तर मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो नजीकच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

 

या घटनेवर आंध्रप्रदेश गृहराज्यमंत्री अनिता यांनीही तीव्र निषेध व्यक्त केला आहे. 3 वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याने त्यांनी हे क्रुर कृत्य असल्याचे सांगितले. जिथे मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून क्रूर कऱण्यात आले. पण पोलिसांनी काही तासांतच आरोपींना अटक करुन त्यांची कार्यक्षमता दाखविली, याबद्दल पोलिसांचे कौतुक आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत. यासोबतच मंत्री अनिता यांनी सरकार प्रकरणाच्या तपासासाठी पूर्ण सहकार्य करणार आणि पीडितेला न्याय मिळवून देणार, असे शोकाकुल कुटुंबाला आश्वासनही दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here