नागपुर (प्रतिनिधी मनोज बाचले) – समुद्रपूर येथे दिनांक १५ ऑगस्ट २०२० स्थानीक रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण
संस्था, पुलगाव द्वारा संचालित -मुक्ताबाई विद्यालय, समुद्रपूर तालुका समुद्रपूर जिल्हा -वर्धा द्वारे कोरोनाचे सावट लक्षात घेता ७४वा भारतीय स्वातंत्र दिन कार्यक्रम सोहळा शाळेच्या प्रांगणात साधेपणाने व आटोपशीर साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. सुधाकरराव घोडे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना शिंदे जेस्ट शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
दोन्ही प्रमुख अतिथी च्या उपस्थितीत श्री. सुधाकरराव घोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. स्वातंत्रदिन कार्यक्रमाचा शेवट जयघोष देऊन करण्यात आला.








