वर्ल्ड वूमन फॉर चेंजच्या वतीने स्वतंत्र दिनानिमित्त गुगल लाईव्ह वर रंगला देशभक्तीपर कार्यक्रम

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – वर्ल्ड वूमन फॉर चेंजच्या वतीने १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनाचे निमित्त साधून गुगल मिट लाईव्ह वर देशभक्तीवर अखिल भारतीय महिला काव्य संमेलन मुंबईचे आयोजन करण्यात आले. गुगल लाईव्ह वर घेण्यात आलेल्या या संमेलनाला मुंबईसह ठाण्यातून २० कवयित्री उपस्थित होत्या. यावेळी देशभक्तीवर कविता करण्यात आल्या. वर्ल्ड वूमन फॉर चेंजच्या संचालिका बिजल जगड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. दरवर्षी वर्ल्ड वूमन फॉर चेंजच्या वतीने विविध कार्यक्रम केले जातात. यंदा कोविड – १९ चा प्रादुर्भाव असल्याने संस्थेच्या वतीने गुगल लाईव्ह वर कार्यक्रम साजरा केला गेला. यावेळी मुंबई तसेच ठाण्यातून २० निवडक कवयित्रीनी देशभक्तीवर कविता रचून त्याचे वाचन केले. यावेळी पायल पांडेय, सुरेश सामर, राजश्री रतावा, डॉ. शुभ्र माहेश्वरी, अलका जैन, ज्योती सरावगी, शिला तिवारी भारती गौरव, सुश्री आराध्य हेमा श्रीवास्तव, हेमाश्री प्रयागराज इत्यादींनी या संमेलनात सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here