जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दुध फेडरेशन जळगाव शाखेचे दुध फेडरेशन परिसर शिवाजीनगर जळगाव येथे नुतन वास्तूत स्थलांतर करण्यात आले
यावेळी जळगाव जिल्हा दुध संघाच्या अध्यक्षा सौ मंदाताई खडसे , जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा सौ रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते फित कापुन बँक शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी दुध संघ संचालक जगदीश बढे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये , सी.एम.पाटील, अशोकभाऊ लाडवंजारी , डॉ अभिषेक ठाकुर , बी.जे.टोके, सुरेश राणे, दुध संघाचे मार्केटिंग मॅनेजर अनंत अंबीकर आदी उपस्थित होते.








