पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : मुंबई द्रुतगती मार्गालगत असलेल्या झुडपात एका महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळील झुडपात एका महिलेचा मृतदेह आढळलाय. तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. महिलेची हत्या करून मृतदेह पोत्यात बांधून झुडपात फेकण्यात आला आहे. आज सोमवारी दुपारी दुर्गंधी पसिरसरात पसरली. त्यानंतर आयआरबी पथकाने पोलिसांना कळवलं. पुढे पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तिथे पोलिसांना एका पोत्यात महिलेचा मृतदेह आढळून आला.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळील हत्या करण्यात आलेल्या महिलेचं अंदाजे वय ३५ वर्षांची असावी. पण ती नेमकी कोण? तिची हत्या कोणी केली? येथील मृतदेह कोणी आणून फेकला? याचा शोध घेणे सुरु आहे.