डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

accident
file photo

सातारा, (प्रतिनिधी) : डंपरची दुचाकीला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या युवतीचा जागीच मृत्यू झाला. पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूर नाका येथे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

 

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. सोनिया अविनाश कांबळे (वय २२ रा. नेहरूनगर, शनिवार पेठ, कर्‍हाड) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.

 

नागरिकांनी व वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी संबंधित युवतीला गंभीर जखमी अवस्थेत नजीकच असलेल्या रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here