रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनी युक्रेन हादरले

क्षेपणास्त्र

किव्ह (वृत्तसंस्था) : रशियाने बुधवारी युक्रेनच्या विविध शहरांवर एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ आली.

युक्रेनचे ऊर्जामंत्री हर्मन हलुश्चेन्को यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले मोठे होते. नागरिकांनी हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित जागेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. ऊर्जा कंपनी युक्रेनर्गोने तातडीने देशातील अनेक भागांतील वीजपुरवठा बंद केला. त्यात खार्किव, सुमे, पाल्टावा, झापोरझ्झिया, दीनप्रोपेस्तोकोव्ह आणि क्रिवोहार्ड या विभागांचा समावेश होता.

 

रशियन सैन्याने प्रामुख्याने युक्रेनच्या वीज उत्पादन केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ले चढविले आहेत, अशी माहिती लेव्हिवचे महापौरांनी काल दिली. सकाळी झालेल्या हल्ल्यात क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर देखील केला. मालमत्तेची किंवा जीवितहानी झालेली नाही. अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली, असा दावा युक्रेनने केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here