शिव कॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले

शिवकॉलनी अपघात

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : शहरातील शिव कॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीस्वार वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १६ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

 

शहरातील खोटे नगरकडून जळगाव शहरात दुचाकीस्वार भारमल कौतिक पाटील (वय ६५, रा. वैजनाथ ता. एरंडोल) हे त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बी डब्ल्यू २७३०) ने जळगाव शहरात येत असताना शिवकॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार असलेले वृद्ध हे वाहनाच्या अवजड वाहनाच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाले.

 

ही घटना घडल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत झालेल्या वृद्धाच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वरून आल्यात धाव घेऊन एकच आक्रोश केला. या संदर्भात पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here