जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर विनोद पाटील) : दिव्यांग बांधवांना धरणगाव नगरपरिषद कडून ५% निधी मिळावा यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच दिव्यांग बांधवांना घरपट्टी ५०% माफ करण्यात यावी. विना अट घरकुल बचत गटांना अर्थसाह्य देण्यात यावे जे दिव्यांग अतिक्रमण मध्ये व्यवसाय करत असतील त्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
नगरपालिका मध्ये उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलात दिव्यांगांना व्यापारासाठी गाडा देण्यात यावा तसेच दिव्यांगांचा विविध प्रश्नांवर देखील सविस्तर चर्चा करून मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्या अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली.
मुख्याधिकारी साहेबांनी सुद्धा आश्वासन दिले की तुमच्या ५% निधी हा तुम्हाला मार्चपर्यंत देण्यात येईल यावेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे तालुका अध्यक्ष संजय पाटील , रवींद्र काबरे, रमेश सपकाळे, राजू चौधरी, रमेश नाना चौधरी, गुलाब माळी, प्रमोद सुतारे, दीपक महाजन , गजानन माळी , महेंद्र भाऊ चौधरी, राजेंद्र फुलपगारे, शबीर पटेल , बाबूलाल पटेल इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







