जयपूरमध्ये १५ सायबर गुन्हेगारांना अटक

cyber-thief
file photo

जयपूर (वृत्तसंस्था) : सायबर गुन्हे करणार्‍या टोळ्यांवर जयपूर पोलिसांनी कारवाई करत १५ तरुणांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी कराडणी व झोटवाडा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. ’सायबर शील्ड’ अभियानांतर्गत जयपूर पोलिसांच्या पाच पथकांनी ही कारवाई केली.कॉल सेंटर आणि सट्टेबाजी अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणार्‍या दोन टोळ्या सक्रिय होत्या.

पोलिसांना खबर्‍यांमार्फत त्यांच्या ठावठिकाण्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून झोटवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांना अटक केली, तर कराधनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ जणांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here