दिल्ली येथे बुलंद पोलीस टाइम्सचे निवासी संपादक प्रभाकर निकम यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान

भारत भूषण पुरस्कार

पुणे (निवासी संपादक प्रभाकर निकम) : दिल्ली न्यु महाराष्ट्र सदन येथे रविवारी (दि.९) केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार ना. रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश भुषण गवई यांच्या मातोश्री व केरळ-बिहार चे माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्या पत्नी कमलाताई गवई यांच्या हस्ते भारत भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

 

भारत भूषण पुरस्कारया पुरस्कार सोहळ्यास राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या मा. सदस्या सुरेखा लमतुरा, भारत सरकार चे राष्ट्रीय युवा पुरस्कार वितरक डॉ. मनीष गवई यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

 

 

यावेळी बुलंद पोलीस टाइम्सचे पुणे निवासी संपादक तसेच राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघठन प्रभाकर निकम यांना सामाजिक क्षेत्रामधील केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल भारत भुषण पुरस्कार देऊन दिल्ली महाराष्ट्र सदन येथे सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here