शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : श्री साईबाबा संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीच्या अध्यक्षा तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे मॅडम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से) यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली श्री साईबाबा संस्थान विभागीय क्रिकेट स्पर्धा दिनांक 07 मार्च 2025 ते 09 मार्च 2025 या कालावधीत यशस्वीपणे संपन्न झाल्या. संस्थानमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागावी, तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये श्री साईबाबा संस्थानच्या एकूण 24 विभागीय संघांनी उत्कृष्ट क्रिकेट कौशल्याचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात श्री साईबाबा हॉस्पिटल संघाने चुरशीच्या लढतीत श्री साई मंदिर सुरक्षा विभाग संघाचा पराभव करून प्रथम विजेतेपद मिळवले.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी बक्षीस वितरण सोहळा श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष श्री अभयभैया शेळके पा, माजी उपनगराध्यक्ष श्री हरिश्चंद्र प्रभाकर कोते पा, छोटे बापू श्री दत्तात्रय गोविंदराव कोते पा, श्री साई एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्री विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन श्री पोपटराव कोते, जनसंपर्क अधिकारी श्री तुषार शेळके, सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र शेळके, संस्थेचे माजी चेअरमन श्री प्रताप कोते पा, डॉ. प्रीतम वडगावे, संचालक श्री रंभाजी गागरे, संचालक श्री तुळशीराम पवार, आणि श्री रवीभाऊ चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्या संघांना खालीलप्रमाणे बक्षिसे प्रदान करण्यात आली:
प्रथम पारितोषिक व चषक ₹31,000/- – श्री साई एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्री विठ्ठलराव पवार
द्वितीय पारितोषिक व चषक ₹21,000/- – माजी नगराध्यक्षा तथा माजी विश्वस्त सौ. योगिताताई अभय शेळके
तृतीय पारितोषिक व चषक ₹11,000/- – कर्मचारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री पोपटराव कोते
चतुर्थ पारितोषिक व चषक ₹7,000/- – माजी महिला चेअरमन सौ. श्रद्धाताई कोते
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री कैलास बापू कोते पा. (माजी नगराध्यक्ष), श्रीमती अलकाताई शेजवळ (माजी नगराध्यक्षा), श्री विजय तुळशीराम कोते पा.(माजी उपनगराध्यक्ष), माजी विश्वस्त श्री सचिनजी तांबे तसेच श्री साईबाबा संस्थानचे विभागप्रमुख, अधीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र कोहोकडे सर यांनी आपल्या अनोख्या शैलीत केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री योगेश गोरक्ष, रवी शेजवळ, सुदेश शिंदे, महेंद्र कोते, संदीप भडांगे, स्वप्निल गायकवाड, संदीप बनसोडे, महेश महाले, गणेश जानेराव, अशोक लोंढे, डॉ. विक्रम सातपुते, आतिक पठाण, सुनिल शेजवळ तसेच साई 11 संघ आणि श्री नवीनजी शेजवळ यांनी विशेष परिश्रम घेतले.







