स्वातंत्र्यदिनी तळोजात भारतीय जवानावर हल्ला

पनवेल (प्रतिनिधी विकास राठोड) – दि.17 सकाळी जवानाला मारहाण करीत असल्याचा एक व्हिडिओ व्हाट्सअप वर आला होता त्या व्हिडिओचा शोध घेऊन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची पनवेल पदाधिकारी आपल्या वीर जवानाकडे पोचली त्यानंतर झालेल्या सर्व प्रकाराचे माहिती घेऊन आपले आर्मीचे जवान श्री मोरे व त्यांच्या कुटुंबाच्या सोबत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना खंबीरपणे उभी राहील, असे आश्वासन दिले.
तसेच यापुढे या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची जर मदत लागली तर अर्ध्या रात्रीत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना धावून येईल.हे अशा प्रकारचे भ्याड हल्ले महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना खपून घेणार नाही ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ही ढाल म्हणून उभी राहील, असे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर सुरेश चाळके, पनवेल शहर प्रमुख विकास राठोड यांनी यावेळी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here