हिंगोली (जिल्हा क्राइम रिपोर्टर विष्णु हनवते) : शेंबाळपिंपरी (ता. पुसद) येथे दुचाकी नेण्याच्या किरकोळ कारणावरून सख्या भावाचा खून करणार्या आरोपी भावाने कळमनुरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि.३१ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली आहे. खंडाळा व कळमनुरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंबाळपिंपरी (ता. पुसद) येथील मनीष जयवंता शिरफुले (२३) याचा त्याचा भाऊ दिनेश जयवंता शिरफुले (२१) याच्या सोबत दुचाकी बाहेर नेण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादात मनीष याने दिनेश याला मारहाण केली. या मारहाणी दिनेश खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्याच्या पाठीमागे लोखंडी फावड्याने वार केला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला यवतमाळ येथे उपचारासाठी नेत असतांनाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खंडाळा (ता. पुसद) पोलिस ठाण्यात शनिवार दि.२९ मार्च रोजी खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनीष हा फरार झाला होता. खंडाळा पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी मोबाईल लोकेशन काढले असता तो कळमनुरी शिवारात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून कळमनुरी पोलिसांना माहिती दिल्यानंतर कळमनुरी पोलिसांनी शोध घेतला असता मनीष याचा मृतदेह कळमनुरी शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ भोसले, जमादार रवी इंगोले, माधव भडके, प्रशांत शिंदे, संजय राठोड, जगन पवार यांच्या पथकाने भेट दिली आहे.
पोलिसांनी याची माहिती खंडाळा पोलिसांनाही कळवली असून खंडाळा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास कायंदे दाखल झाले आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात नोंद घेतली







