बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्यावतीने विनामूल्य आरोग्य शिबिर

बालरंगभूमी परिषद कल्याण

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : बालरंगभूमी परिषद कल्याण शाखा आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष कला, सांस्कृतिक सेल व डॉक्टर्स सेल यांच्या सहकार्याने बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्षा ॲड.श्रीमती.निलम शिर्के-सामंत यांच्या संकल्पनेतून बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या सर्व सभासदांचे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर सोमवारी (दि.३१) अभिनव विद्या मंदिर, पारनाका कल्याण येथे आयोजित करण्यात आले होते.

 

यावेळी डॉक्टर्स सेल अध्यक्ष डॉ. विनय पाटील तसेच डॉ.श्रीमती.मंजू पाटील डॉ.संकेत मनेरीकर व त्यांचे सहकारी परिचारिका श्रीमती. प्रीति भानुशाली, श्रीमती. अक्षता मोरे तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा अध्यक्ष रविंद्र सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक सेल अध्यक्ष हेमंत यादगीरे, जेष्ठ रंगकर्मी अरविंद सरफरे, बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या अध्यक्षा सुजाता कांबळे-डांगे, उपाध्यक्ष संजय गावडे, प्रमुख कार्यवाह शिवाजी शिंदे, कोषाध्यक्ष दिपक चिपळूणकर, सहकार्यवाह विशाल पितळे व मेघा शृंगारपुरे, कार्यकारिणी सदस्य सौरभ आरोटे, सल्लागार प्रीति बोरकर, सई मेहेर, भूषण मेहेर या मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी देवमाणूस सिरियल फेम नाट्य- सिने अभिनेते किरण डांगे यांची विशेष उपस्थिती होती.

 

या आरोग्य शिबिराला जवळपास ३५ सभासदांनी उपस्थित राहून ईसीजी, शुगर, रक्तदाब, वजन आदी वैद्यकिय सेवेचा लाभ घेतला. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक सेल व डॉक्टर्स सेल यांचे तसेच अभिनव विद्यामंदिर पारनाका कल्याण यांनी सभागृह (हॉल) उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवाजी शिंदे यांनी त्यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शेटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here