सासरच्यांनी घरातून हाकलल्याने नवविवाहितीने संपवलं आयुष्य

नवविवाहितीने संपवलं आयुष्य

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : देवळामध्ये नवविवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. हा त्रास सहन न झाल्यामुळे अंबिका मयूर पवार या महिलेने आत्महत्या केली.

 

ही घटना देवळा शहरातील इंदिरा नगरमध्ये घडली. या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबिका मयूर पवार या विवाहितीने आत्महत्या केली. सात महिन्यांपूर्वीच अंबिकाचे लग्न झाले होते. पण लग्नानंतर सासरची मंडळी तिचा छळ करू लागले. बाईक घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी अंबिकाचा पती, सासू, सारे आणि नणंद तिला त्रास देत होते. या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अंबिकाने आत्महत्या केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अंबिकाच्या नवरा, सासू, सासरे आणि नणंद या चौघांना अटक केली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here