जळगाव (संपादक सुनिल पाटील) : शहरामध्ये शनिवारी दुपारी यूपीआय सेवा अचानक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. या काळात, बऱ्याच जणांना युपीआयद्वारे पेमेंट करता आले नाही. आउटेजचा मागोवा घेणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरने देखील या आउटेजबद्दल माहिती दिली. या आउटेजचा परिणाम पेटीएम, फोनपे आणि गुगल पे वापरकर्त्यांवर दिसून आला असल्याचे म्हटले आहे.
डाउनडिटेक्टरवरून ही सेवा शनिवारी दुपारी १२ वाजल्यापासून ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे. या काळात, पेटीएम, फोनपे आणि गुगल पे वापरकर्ते यूपीआय पेमेंट करू शकले नाहीत. यावेळी काही वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केल्या.
शनिवारी दुपारी १२ वाजल्यापासून लोकांनी डाउनडिटेक्टरवर युपीआय समस्यांबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली. या काळात, युपीआय क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर, वापरकर्ते पेमेंट प्रक्रिया पाहू शकतात, परंतु ५ मिनिटांनंतरही पेमेंट प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने युपीआय वापरणाऱ्यांना याचा फटका बसला. संपूर्ण भारतात ही अडचण आली असल्याचे समजते आहे. मात्र कोणत्या राज्यांना याचा फटका बसला आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.







