अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : पिंपळनेर महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था पिंपळनेर संचलित अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उमेश माळी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मनेष माळी, जेष्ठ शिक्षिका छाया साखरे ,प्रा.पोर्णिमा भामरे हे होते. प्रथमतः घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

प्रा.विजय ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य आणि जीवनावर अनमोल विचार मांडलेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ढोले यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.प्रविण पगारे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका आशालता लाडे,प्रतिभा साळवे, चारुशीला पवार,संगीता सोनवणे, सविता वाघ,शिक्षक,संदिप पवार,शरद सुर्यवंशी, अरविंद पगारे, राकेश पगारे, रितेश एखंडे,बन्सीलाल बहिरम ,शरद मोहिते,सचिन साळुंखे ,किरण नहिरे , भालचंद्र घरटे,चौकीदार वसंत सुर्यवंशी आदी प्रयत्नशील होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here