देखभालीसाठी ठेवलेल्या नोकरानेच ज्येष्ठ नागरिकाची केली १४ लाखाची फसवणूक

pripaid-task-fruad

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : ज्येष्ठ नागरिकाच्या देखभालीसाठी ठेवलेल्या नोकरानेच १३ लाख ९२ हजार रुपयांची फस‌णूक केल्याचा प्रकार उघडकीस पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नोकरावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

३८ वर्षीय तक्रारदाराने हडपसर पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शिवकुमार पोद्दार (वय २६, रा. बलिया, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांच्या देखभालीसाठी सत्यसेवा नर्सिंग सर्व्हिसेसकडून पोद्दार याला ज्येष्ठ नागरिकाची देखभाल करण्यासाठी ठेवण्यात आले होते. वर्षभरापासून तो तक्रारदाराच्या वडिलांची देखभाल करत होता. ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल बँक खात्याला जोडण्यात आला होता. पोद्दारने बँक खात्याच्या माहितीचा गैरवापर करुन खात्यातून वेळोवेळी १३ लाख ९२ हजार रुपये स्वत:च्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here