जळगाव (संपादक सुनिल पाटील) : अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेची बैठक पुण्यात हमाल भवन येथे रविवारी (दि. १५) संपन्न झाली यावेळी महाराष्ट्रातील शाहीर व लोककलावंत मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे कार्याध्यक्ष आणि विश्वस्त रमेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी रमेश कदम यांनी आपले विचार मांडताना सांगितले की सध्याच्या काळामध्ये शाहिरांची आणि लोक कलावंतांचे मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यांना न्याय मिळणं अशक्य झालं असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली पूर्वीच्या काळी शासनाला आम्ही दिलेली मागणी जशीच्या तशी मान्य होत असे परंतु सध्या शाहिरांमध्ये आणि कलावंतांमध्ये आलेल्या विस्कळीतपणामुळे शासनकर्त्यांच्या मनमर्जी धोरणामुळे त्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे आपल्याला न्याय मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकसंघ राहून न्याय मिळवून घेतला पाहिजे आणि अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेची चाळीस वर्षाची परंपरा आता तरुणांनी पुढे नेली पाहिजे असे मनोगत रमेश कदम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले
कार्यक्रमाच्या अगोदर दिवंगत शाहीर बाबासाहेब मधुकर नेराळे यांच्या प्रतिमेस रमेश कदम यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करूनत्यांना मानवंदना देण्यात आली यावेळी व्यासपीठावर शाहीर सम्राट देवानंद माळी शाहीर आप्पा उगले जालना विनोद ढगे जळगाव आप्पा खताळ धुळे शाहीर सावंत मुंबई आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होती तर राज्यभरातून आलेल्या तरुण शहरांची व लोक कलावंतांची संख्या मोठ्या प्रमाणात लक्षणीय होती यावेळी 20 ऑक्टोबर 25 रोजी जळगाव येथे एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे असे रमेश कदम यांनी यावेळी जाहीर केले
शाहीर सम्राट देवानंद माळी सांगली यांनी आपल्या भाषणात सांगितले की कलावंतांचे प्रश्न आणि त्यांच्या वेदना याचा विचार करूनच शाहीर परिषदेचे पुनर्गठण करण्याचे प्रयत्न आम्ही ठरवले त्यात सर्वांनी सहकार्य केले भविष्यात तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ज्येष्ठांचा सन्मान करण्यासाठी आपणा सर्वांना पुन्हा प्रयत्न करावे लागतील असे देवानंद माळी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले
यावेळी शाहीर आप्पा उगले जालना आप्पा खताळ धुळे शाहीर दिलीप सावंत कोल्हापूर शाहीर आनंद सावंत मुंबई शाहीर सचिन उभे मुंबई शाहीर दिवे मुंबई शाहीर शिवाजी भोसले रत्नागिरी शाहीर मंगेश साळुंखे मावळ शाहीर गुरुराज पुणे शाहीर मल्हार बेलोसे पाचगणी शाहीर जीवन बंधन बुलढाणा शहीद किशोर शितोळे रत्नागिरी शाहीर रामदास कदम परभणी शाहीर माने शाहीर श्याम डोंगरे हिंगोली शाहीर श्रीकांत शिर्के शाहीर व्यवहारे पंढरपूर यांनी आपले विचार उपस्थितांसमोर मांडले.
यावेळी तरुण शाहीर रामानंद उगंले यांनी बैठकीस मार्गदर्शन केले व भविष्यात शाहीर परिषदेसाठी पूर्णपणे काम करण्याचे अभिवचन त्यांनी दिले. शाहीर परिषदेचे विनोद ढगे जळगाव यांनी सांगितले की लोककलावंतांनी संघर्ष करून समाजाला न्याय दिलेलाच आहे परंतु स्वतःच्या न्यायासाठी सत्ताधाऱ्यांच्या पाठीमागे न लागता संघर्षाने काय मिळवता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. लोककलेचे संवर्धन व्यक्त केले शाहीर रामानंद उगले यांच्या गाण्याने बैठकीचा समारोप करण्यात आला. आयोजकांतर्फे मान्यवरांचा सत्कार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.







