विविध मागण्यांसाठी कोळी समाजाचे यवतमाळ तहसीलदारांना निवेदन

यवतमाळ (विदर्भ संपादक ॲड.चंद्रकांत कराळे) – बुधवारी दि. २० तहसीलदार यवतमाळ यांना येथील कोळी समाजातील जातीचे दाखले जात प्रमाणपत्र करतांनी विविध विषयावर मागणीचे निवेदन कोळी महासंघ यांच्यावतीने निवेदन देण्यात आले निवेदना देताना याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष दुर्गाताई भुजबळ यांच्यासह मराठा खाली कोळी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक गजेंद्र भाऊसाहेब तालुका यवतमाळ अध्यक्ष संगी साहेब उत्तमराव राणे उपाध्यक्ष भुसारे उत्तमराव इत्यादींच्या उपस्थित होते.
तालुका तहसीलदार यवतमाळ यांना कोळी समाज बांधवांना प्रामाणिकपणे व सुरळीतपणे जातीचे दाखले वेळोवेळी दाखल झालेल्या तारखेपासून तीन महिन्याच्या आत जातीचे प्रमाणपत्र मिळाला हवे राज्यात लाखो कोळी समाज बांधवांची संख्या असल्याने प्रत्येक गाव व शहर जिल्ह्यातील कोळी समाज बांधवांना जातीचे प्रमाणपत्र सुलभ गतीने देण्यात यावे अनेक विषयी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले व त्वरित मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष दुर्गाताई भुजबळ यांनी दिली आहे शासनाने तात्काळ अनुसूचित जमातीच्या हक्क व अधिकारापासून वंचित राज्यातील एक कोटी जमातीवरील घटनाबाह्य अन्याय दूर करावे व कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभ पणे मिळावे . आणि कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय थांबवण्यात यावा. इतर मागण्याचे निवेदन तहसीलदार यवतमाळ यांना कोळी समाजाचे वतीने देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here