चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

accident
file photo

जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : जळगाव ते आसोदा रोडवर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना आज ३ जुलै रोजी सकाळी घडली.मात्र या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात नातेवाईकांनी मोठा आक्रोश करत आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली.

या घटनेबाबत असे की, जळगाव तालुक्यातील भादलीत कुटुंबासह वास्तव्यास असलेले मोहम्मद इब्राहिम खाटीक (वय-३८ रा. भादली ता. जळगाव) हे जळगाव शहरातील गांधी मार्केट येथे कापड दुकान चालवून तो आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे मोहम्मद खाटीक हा गुरुवारी ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घरून निघून जळगाव शहराकडे दुचाकीने एकटाच येत होता.त्यावेळी मागून येणारी चारचाकी कारने मोहम्मद याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मोहम्मद हा गंभीर रित्या जखमी झाला, त्यामुळे त्यांच्या दुचाकीच्या मागे येणारे मित्र जावेद पटेल आणि शाहरुख पटेल यांनी त्याला जखमी अवस्थेत उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मयत घोषित केले.
यावेळी खाटीक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हरून नदी आणि बिट्टू सलार यांनी देखील नातेवाईकांचे सांत्वन करत शांत केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संबंधित कारचालकासह एकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here