लँडिंगदरम्यान रशियन प्रवासी विमानाचा अपघात; क्रूसहित ५० प्रवाशांच्या मृत्यूची शक्यता

विमानाचा अपघात

मॉस्को (वृत्तसंस्था) : चीनच्या सीमेलगत असलेल्या रशियाच्या पूर्वेकडील भागात पाच मुलांसह ४७ जणांना घेऊन जाणारे ट्विन टर्बोप्रॉप अँटोनोव्ह एन-२४ हे प्रवासी विमान कोसळले असून, सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे.

रशियातील विमान ब्लागोवेश्चेन्स्कहून टिंडा येथे जात होते. हा संपूर्ण ५७० किलोमीटरचा प्रवास होता. परंतु टिंडा येथे पोहोचण्यापूर्वीच विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. अमूर प्रदेशाचे राज्यपाल वसिली ऑर्लोव्ह यांनी विमानात ४३ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स असल्याची पुष्टी केली. रशियाच्या आपत्कालीन सेवांनी दिलेल्या माहितीनुसार विमान टिंडापासून काही किलोमीटर अंतरावर रडारवरून दिसेनासे झाले. त्यानंतर शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली. परंतु बहुतेक क्षेत्रात दाट बोरियल जंगल असल्यानं शोध मोहिमेला अडथळा आल्याचं रशियाच्या माध्यमानं म्हटलं आहे. १९५० च्या दशकात विकसित केलेल्या अँटोनोव्ह एन-२४ या विमानाचा मालवाहू आणि प्रवासी वाहतुकीसाठी रशियात मोठ्या प्रमाणात वापर होतो.
प्राथमिक विश्लेषणावरून असे दिसून येते की, कमी दृश्यमानतेमुळे लँडिंग करताना पायलटची चूक झाल्यामुळे हा विमान अपघात झाला असण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here