अहिल्यानगर (अहमदनगर) (जिल्हा क्राइम रिपोर्टर अण्णासाहेब बनसोडे) : महसूल विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा व विविध योजनांची माहिती मिळावी, त्यांचा लाभ घेता यावा, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि शासनाबद्दलचा विश्वास वाढावा, या उद्देशाने जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.
शेतकरी व नागरिकांच्या तक्रारींचे होणार निवारण
राज्य शासनाच्या निर्देशानुसार हा सप्ताह साजरा करण्यात येणार असून यादरम्यान महसूल विभागाच्या सेवा प्रभावीपणे नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातील. शेतकरी व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण व महसूल विषयक जनजागृती हा सप्ताह साजरा करण्यामागचा मुख्य हेतू असुन महसूल सप्ताहाचा प्रारंभ होईल. कार्यरत व सेवानिवृत्त महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.







