पुणे पोलिसांनी केली १९ लाख रुपयांची गावठी दारू जप्त

crime
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : पुणे मार्केट यार्ड, सेल पिंपळगाव आणि आंबी मावळ येथील विविध हातभट्ट्यावर छापे मारत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने १९ लाख ७१ हजार २०० रुपयांची दारू जप्त केली आहे.

एकूण पाच गुन्ह्यांमध्ये चार आरोपीसह ३२२० लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण १९ लाख ७१ हजार रुपये किमतीचा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवा राठोड, सोमनाथ थोटे, विष्णू उदावंत आणि सुशील सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here