पुणे विमानतळावर प्रवाश्याकडून ६ कोटींचा गांजा जप्त

गांजा जप्त
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : येथील विमानतळावर बँकॉक वरून आलेल्या एका प्रवाश्याकडून ६ कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. कस्टम विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे विमानतळावर कस्टम विभाग आणि एअर इंटेलिजन्स युनिट कडून करण्यात आलेल्या कारवाईत अतुल सुशील हिवळे या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई ५ ऑगस्टला पुणे विमानतळावर कस्टम विभाग आणि एअर इंटेलिजन्स युनिट कडून करण्यात आली. बँकॉक ते पुणे असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेस या विमानातून हा प्रवासी आला होता. हा प्रवासी संशयास्पद असल्याचं संबंधित विभागाला लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रवाशाला चौकशीसाठी बोलावले.
अतुल हिवळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता चौकशी दरम्यान त्याच्या ट्रॉली बॅगची तपासणी करण्यात आली. यात त्याच्या बॅगमध्ये ६ किलो गांजा मिळून आला. बाजारभावानुसार ६ किलो गांजाची किंमत साधारण ६ कोटी १२ लाख असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here