भरधाव बसची ट्रॅक्टरला धडक, १० प्रवाशांचा जागीच मृत्यू

बसची ट्रॅक्टरला धडक

बर्दवान (पश्चिम बंगाल) (वृत्तसंस्था) : पूर्व बर्दवान जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला. शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग १९ वर नाला फेरी घाटाजवळ भरधाव खासगी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात किमान १० जणांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमध्ये ५ लहान मुलेही प्रवास करीत होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. सर्व प्रवासी बिहारचे रहिवासी असून, तीर्थयात्रेसाठी निघाले होते. दुर्गापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. स्थानिक आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्याला सुरूवात केली.
३५ प्रवासी जखमींना बर्दवान मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस खूप वेगानं जात होती. दरम्यान, चालकाला पार्क केलेला ट्रॅक्टर दिसला नव्हता. त्यामुळे बस ट्रॅक्टरच्या मागील बाजूस जोरात आदळली. टक्कर इतकी भीषण होती की, बसचा पुढचा भाग चेंदामेंदा झाला. तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अपघात घडल्यानंतर अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते. सध्या पोलीस, स्थानिक आणि बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here