सातारा (उपसंपादक लव चव्हाण) । वडूज येथे इस्लाम धर्माचे प्रेषित मुहंमद पैगंबर जंयती ( ईद-ए- मिलादुन्नबी ) उत्साहात व शांततेत साजरी करण्यात आली. यावेळी मुल्ला मस्जिद ट्रस्ट व मुस्लीम समाजातर्फे विविध धार्मिक कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजीक ऐक्य आणि सद्भावनेचे प्रतिक असणाऱ्या हजरत मुहम्मद पैंगबर यांच्या जन्मदिनाला पंधराशे वर्ष पुर्ण होत आहेत . हा साजरा होणारा पवित्र दिवस मुस्लीम बांधवासाठी अत्यंत महत्वाचा आहे . या दिवशी मुहमंद पैंगबर यांची शिकवण , त्यांचा त्याग , सत्य करुणा , मानवता आणि प्रेमाचा संदेश स्मरणात ठेवला जातो. मुल्ला मसजीद अहले सुन्नतवल जमात मस्जिद मध्ये अंत्यत भक्तीमय वातावरणात मसजीदचे मौलाना तोसीफ रजवी यांनी धार्मीक तकरीर (प्रवचन ) केले व मुहमंद पैगंबरांच्या जीवन चरित्रा विषयी माहिती दिली.
हिंदू – मुस्लीम ऐक्याच्या सामाजीक सलोख्याचे दर्शन ..
गणेशोत्सव व ईद -ए – मिलाद कार्यक्रम एकाच वेळी आल्या कारणाने प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शुक्रवार ऐवजी रविवारी शहरातून जंयतीची मिरवणूक काढण्यात आली .यावेळी अनेक हिंदू समाज बांधवानी मिरवणूकी सोबत उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या व हिंदू – मुस्लीम ऐक्याच्या सामाजीक सलोख्याचे दर्शन घडविले . तर देशाभिमान अंगी बाळगत या मिरवणूकीत तिरंगाही फडकल्याने शहरात सामाजीक ऐक्याचे कौतुकही केले जात होते .
येथील मुस्लीम समाज बांधवाच्या वतीने सकाळी १० वाजता वडूज शहरातून मिरवणूक ( जुलूस ) काढण्यात आली . यावेळी मिरवणूकीत झेंडे घेतलेली लहान मुले तसेच देशाचा स्वाभीमान तिरंगा ध्वजही मिरवणूकीचे आकर्षण ठरत होती . यावेळी धार्मीक गीते सादर करण्यात आली.
संध्याकाळी ६ ते ९ पर्यंत समाजातील ४५ लहान मुला – मुलींनी मुस्लीम धर्मातील पवित्र कुराण शरीफ मधील आयत व सुरे पठण , व्याख्याने , नात शरीफ , बयानात सादर करणेत आली. यावेळी हजरत सिद्धीलाल शाहबाबा दर्ग्यात सलाम पठण, चादर शरीप व ग्रंथ पठण करण्यात आले व सर्वासाठी दुआँ मागण्यात आली. सहभागी सर्व, मुलांना मुल्ला मस्जिद ट्रस्ट व मुस्लीम समाजा तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला यांनी स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी खाँजा गरीब ग्रुप, हजरत सिद्धीलालशाह ऊरुस कमेटी, के.जी.एन. ग्रुप, रजा ग्रुप यांनी परिश्रम घेतले. यावेळी मुस्लिम समाजाचे सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







