घरकाम करणाऱ्या तरुणीची मालकाच्या घरात आत्महत्या

sucide-by-girl
प्रतीकात्मक चित्र

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) । अँटॉप हील येथे घरकाम करणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने मालकाच्या घराच्या बाल्कनीमध्ये आत्महत्या केली आहे. तिच्यावर चोरीच्या संशयातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव चोईसांग तामांग असे आहे.

चोईसांग तामांग ही मूळची दार्जिलिंगची आहे. ती दोन वर्षांपासून ती अँटॉप हिल येथील आशियाना सोसायटीत घरकाम करीत होती. ती तिथेच राहत असल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह घराच्या बाल्कनीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अँटॉप हिल पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवलं. मात्र त्यापूर्वीच तरुणीचा मृत्यू झाला होता. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाइड नोट लिहून ठेवली आहे.पोलिसांनी घराचा तपास केला तेव्हा पोलिसांना सुसाईड नोट सापडली. तिने त्यात लिहले होते मी प्रामाणिकपणे काम केले, काही चोरी केलेली नाही असे तिने लिहले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here