मुंबई (उपसंपादक भगवंत शिंदे) । मदर टेरेसा कॉन्व्हेन्ट स्कूल विद्यालय, ,घणसोली यांनी वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांमधील क्रीडाभाव, संघभावना आणि निरोगी स्पर्धेचा उत्कृष्ट परिचय झाला. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून , जिजामाता कॉन्व्हेन्ट स्कूल व कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. सपना गुप्ता मॅडम , सौ.वंदना धुलेधुले मॅडम, व तसेच गजानन चारिटेबल संस्थेचे सचिव डॉ. श्री व्ही. टी. पाटील सर उपस्थित होते. त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि सर्वांगीण विकास घडतो हे अधोरेखित केले.
दिवसाची सुरुवात भव्य मार्च-पास्टने झाली, त्यानंतर विविध धावण्याच्या स्पर्धा, मैदानी खेळ आणि आकर्षक सादरीकरणे जसे की एरोबिक्स, योग व रंगीबेरंगी ड्रिल्स यांनी कार्यक्रमाला अधिक सुंदर बनवले.
या कार्यक्रमात शाळेचा गौरव वाढवणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ. राधिका कांबळे मॅडम , सौ. वंदना धुलधुले मॅडम यांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांना पुढेही उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करत राहण्याचे प्रोत्साहन देण्यात आले. या कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सहभाग होता.






