सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष तसेच खटाव पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय चव्हाण यांनी गणेशवाडी ता. खटाव येथे काल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
गणेशवाडी येथे ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेली धनंजय चव्हाण यांनी बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत ग्रामविकास, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण आदी मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या अडचणी व मागण्या मांडल्या. प्रश्नांची दखल घेत धनंजय चव्हाण यांनी संबंधित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नाशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला उपस्थित मान्यवर अमर साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ घाडगे, माजी सरपंच अंकुश राऊत, माजी उपसरपंच दादासाहेब साळुंखे, अमोल साळुंखे, तुषार राऊत, गोरख काळे, दादा शिंगाडे, रमेश शिंगाडे माजी उपसरपंच, रमेश बुरुंगले, राहुल राऊत, तुषार जगदाळे, दत्तात्रय राऊत, नानासाहेब कोळेकर, हणमंत सजगणे, सागर सजगणे, देवेंद्र सीतापे, ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.







