सातारा जिल्ह्यात कोरोना मुक्तीचे प्रमाण वाढले

होम आयसोलेशनमध्ये बरे होण्याचा टक्का वाढतोय
● कोरोनाचे विघ्न टळू दे म्हणून बाप्पाला जिल्हावासियांचे साकडे
● शनिवारी 342 जणांना डिस्चार्ज
● जिल्ह्यात 8 बाधितांचा बळी
● आरोग्य कर्मचारी, पोलिसांच्या तपासण्या वाढवल्याने संख्या मोठी
●रात्रीच्या अहवालात 345 जण बाधित
सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – बाप्पा गजाननाचे जिल्ह्यात आगमन झाले आहे. ‘कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव थांबवा आता’ अशी आर्जव विघ्नहर्त्या बाप्पांकडे करत जिल्हावासीयांनी ‘हे संकट लवकर टळू दे’ असे साकडे घातले आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा वेग त्याच प्रमाणात आहे. 60 टक्के रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. काळजी म्हणून पोलीस, महसूल, आरोग्य कर्मचाऱ्यांची तपासणी केल्याने त्यांचे बाधित होण्याची संख्या मोठी दिसत आहे. जिल्ह्यात होम आयसोलेशनचा चांगला फायदा बाधित रुग्णांना होत आहे. बरे होणाऱ्यांची संख्या चांगली असून जिल्ह्यातील 784 जण हे होम आयसोलेशनमध्येच उपचार घेत आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह हे नियमितपणे आढावा घेत असून वाढता मृत्युदर रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, शनिवारी 342 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आतापर्यंत एकूण 5550 जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. तर दिवसभरात 8 बाधितांचा मृत्यू झाला असून रात्री उशिरा आलेल्या अहवालात 345 बाधित आढळून आले.
नागरिकांचे बाप्पाला साकडे
कोरोनाचे संकट चांगलेच जिल्ह्यात थांबले आहे. या संकटाला हाकलून देण्यासाठी प्रशासन मेहनत घेत आहे. गणपती बाप्पांचे आगमन झाले असून बाप्पा गणेशाकडे प्रार्थना करत हे संकट टळू दे अशी प्रार्थना नागरिक करत आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाचा जसा आकडा वाढत आहे तसाच कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाण तेवढेच असून सध्या 60 टक्के एवढे झाले आहे. महसूल, पोलीस आणि वै वैद्यकीय क्षेत्रात काळजीस्त्व तपासण्या केल्याने त्यांच्या बधितांचा आकडा वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. जिल्ह्यात गणपती बाप्पा अगदी साधेपणाने कोरोनाच्या सावट असल्याने आले आहेत. गणेशाच्या आगमनावेळी आणखी प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चव्हाण व जिल्ह्यातील सर्वच गणेश भक्त दिलेले नियम पाळून हा उत्सव साजरा करत आहेत. दुसऱ्या बाजूला कोरोना बाधित होण्याचे प्रमाण गेल्या 22 दिवसात टप्प्याटप्प्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात कोरोना मुक्तीचा वेग आहे. जिल्ह्यातील 1500 ग्रामपंचायती पैकी 777 ग्रामपंचायतमध्ये बाधित आढळून आले आहेत. पुणे विभागात सातारा दोन नंबरला आहे.
होम आयसोलेशन चांगला पर्याय
जिल्ह्यातील सर्व उपचाराची ठिकाणी हाऊस फुल झाली आहेत.नव्याने जे बाधित आढळून येत आहेत.त्यांना उपचारासाठी घरच्या घरीच उपाय सुरू केला आहे. दि. 5 पासून सुरू केलेली हा उपक्रम चांगलाच यशस्वी होत आहे. या होम आयसोलेशनमध्ये जावली 5, कराड 223, खंडाळा 24, खटाव 17, कोरेगाव 69, माण 15, महाबळेश्वर 27, पाटण 38, फलटण 30, सातारा 268, वाई 68, एकूण 784 एवढ्या जणांनी उपचार घेत असून अनेक बरे झाले आहेत.
जिल्ह्यातील 342 जणांची कोरोनावर मात
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 13, कराडतालुक्यातील 144, खंडाळा तालुक्यातील 25, खटाव तालुक्यातील 5, कोरेगाव तालुक्यातील 26,महाबळेश्वर तालुक्यातील 15, माण तालुक्यातील 4, पाटण तालुक्यातील 17, फलटण तालुक्यातील 16, सातारा तालुक्यातील 60, वाई तालुक्यातील 17 असे एकूण 342 नागरिकांचा समावेश आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 361 बाधित
कराड तालुक्यातील गोटे 1, कराड 1, पाटण कॉलनी शनिवार पेठ 2, विद्यानगर 1, बेलवडे बु. 2, कृष्णानगर उंब्रज 1, कोयना वसाहत मलकापूर 1, रविवार पेठ 1, कराड 1, करवडी 1, कोळेवाडी 2, शनिवार पेठ पाटन कॉलनी 1, अष्टविनायक कॉलनी 1, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शनिवारपेठ मुळीक चोक 1, शनिवार पेठ 1, धरवशी गल्ली शनिवार पेठ 1, कोयना वसाहत 1,धोंडेवाडी 2, शनिवार पेठ 1, मुंढे 1, उंडाळे 9, कराड 9, हजारमाची 1, बनवडी 2, मसूर 3, यशवंतनगर 1, पाल 1, कालेटेक 1, म्हावशी 1, शनिवार पेठ 1. आगाशिव नगर 2, साकुर्डी 1, पोलीस स्टेशन 1, रठरे बु. 1, मलकापूर 12, शेरे 1, कृष्णा मेडिकल कॉलेज 2, सह्याद्री हॉस्पिटल 3, गुरुवार पेठ 4, बाहे 5, मसुर 2, वाकण रोड 1,ओंढ 1, साळशिरंबे 1,जखीणवाडी 1, वारुंजी 1, सुपणे 1,रविवार पेठ 3, कार्वे 1, रेठरे खु.1, कोयना वसाहत 1, काले 1, हजारमाची 1, विद्यानगर 3, कोयना वसाहत 2, शनिवार पेठ 1, सोमवार पेठ 2, मसुर 1, शेरे 1, किवळ 1, श्री हॉस्पिटल 1, मंगळवार पेठ 2,उंब्रज 1. मलकापूर 5,वाडोली 3, कराड 2 , कोळे 1, आगाशिवनगर 1.
सातारा तालुक्यातील मंगळवार पेठ 1, पोलीस लाईन 1, शाहुपुरी 2, सातारा 1, शुक्रवार पेठ 1, गोडोली 1, घराळवाडी येवती 1, कसुंबी 1,किरोली वाठार 1,कुसुंबी 1, बेलवडे हवेली 1, सैदापूर 1, सातारा हेड ऑफिस 1, गोडोली 1, सिव्हील कॉलनी 1, विसावा नाका 1, पोलीस लाईन 1, देवी चौक 1,गुरुवार पेठ 1, सोमवार पेठ 1, सिटी पोलीस लाईन 2, निनाम 1, सदर बझार 2, सातारा 1, इंगळेवाडी (नुने) 1, पोलीस लाईन रविवार पेठ 1, म्हसवे (वर्ये) 1, भरतगाववाडी 1, पोलीस हेडक्वार्टर 1, मंगळवार पेठ 2, कुसुंबी 1, गोळीबार मैदान 1,मंगळवार पेठ 1, शाहुपुरी 1, करंजे 1, मोती चोक 2, सैनिक नगर सदरबझार 1. भरतगाववाडी 1, कारंडवाडी 2, गजवडी 1, सुटकेस चोक 2,शिवथर 3, सातारा 9. वडुथ 1.
खटाव तालुक्यातील वांजळी 1, पुसेगाव 3, वेटणे 5. कोरेगांव तालुक्यातील जोतिबाचामळा रहीमतपूर 1, पिंपोडे बु. 3, तडवळे 2,पतवाडी 1, आर्वी 1, पिंपोडे 1,धामनेर 3, शांतीनगर 4, संभाजीनगर 1,कोरेगांव 1, पोलिस स्टेशन 2. कोरेगांव 1. फलटण तालुक्यातील संजीवराजे नगर 1, बुधवार पेठ 1,सोमवार पेठ 1, हत्तीखाना 1, लक्ष्मीनगर जल मंदिर 1, मोनिता गार्डन 1, कोळकी मालोजीनगर 1. गोलेगाव 1,नांदळ 4, पाडेगांव 1, हिंगणगाव 1, कोळकी 5, ठाकुर्की 2, पोलीस कॉलनी 1. महाबळेश्वर तालुक्यातील गवली मोहोल्ला 1. महाबळेश्वर 10, नगरपालिका 1. माण तालुक्यातील शिंदी खुर्द 1, गोंदवले बु. 1. दहिवडी 9. इंजबाव 4, पाटण तालुक्यातील सणबुर 2, पाटण 1, तारळे 1. येरफळे 1. खंडाळा तालुक्यातील लोणंद 5, मरीआईचीवाडी 1. रामोशी आळी शिरवळ 1, शिरवळ 1, गुठले 1, शिंदेवाडी 3, पारगांव खंडाळा 1,भादे 3, वडवाडी 1, स्टार सिटी शिरवळ 1, लोणंद 7. वाई तालुक्यातील उडतरे 4, केजळ 1, विरमाडे 1, पाचवड 1, ओझर्डे 1. ब्रामणपुरी 2. शेंदुर्जणे 2,बावधन ओढा4, उडतरे 11, बोपर्डी 2, बावधन 2, गणपत आळी 1, सिध्दनाथवाडी 5, सोनगीरवाडी 4. पाचवड 1, जावली तालुक्यातील मेढा 2, महिगाव 4, आनेवाडी 1, गोगवे 2. कुडाळ 5.इतर आटपाडी सांगली 1, चिंचणी अंबक सांगली 2, बोरगाव वाला 1.
444 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सर्वसाधारण रुग्णालय सातारा 12, कोरेगाव 30, खंडाळा येथील 90, मायणी येथील 22, महाबळेश्वर 7, पानमळेवाडी 60, खावली 160 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 63 असे एकूण 444 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात शनिवारी – एकूण बाधित345, एकूण मुक्त 342, एकूण मृत 8.
जिल्ह्यात शनिवारापर्यंत एकूण नमुने 40043, एकूण बाधित 9714, एकूण मुक्त 5550, मृत्यू 296, उपचारार्थ रुग्ण 4210

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here