योग्य काळजी घेत गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर योग्य काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी कुटुंबीयांसमवेत वर्षा निवासस्थानी गणरायाचे स्वागत केले. त्यावेळी ते म्हणाले बोलत होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवा, कुठे गर्दी करू नका, ऐकमेकांपासून आंतर ठेवून रहा. सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क, सतत हात धुत राहणे, या उपाय योजनांचे भान कधीही हरपू देवू नका. असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here