चित्रपट बघतांना पती जवळ न बसल्याचा राग आल्याने पत्नीने केले पतीवर चाकूने वार

चाकूने वार

भंडारा (प्रतिनिधी) । प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील नाकाडोंगरी येथे बॉर्डर २ हा चित्रपट बघतांना पती जवळ बसला नाही. या कारणावरून संतापलेल्या पत्नीने पतीवर चाकूने जीवघेणा वार करून त्याला जखमी केले आहे.

नाकाडोंगरी येथील जिल्हा परिषद शाळेत तासिका शिक्षक म्हणून कार्यरत असणारे आशिष मिश्रा आपला परिवार व मित्रांसोबत तुमसर येथे ‘बॉर्डर २’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. आशिष मिश्रा हे आपल्या मित्रांसोबत मागील रांगेत बसले, तर त्यांची पत्नी ही समोरच्या रांगेत बसली. चित्रपट संपल्यानंतर ते घरी गेले. घरी ‘तू माझ्याजवळ का बसला नाहीस?’ यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. पत्नीने रागाच्याभरात घरातील चाकू काढून आशिष यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा हाताला गंभीर जखम झाली.
या हल्यात ते रक्तबंबाळ झाले असून, वेळीच उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. शिक्षक आशिष मिश्रा यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी गोबरवाही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here