मुंबई (संपादक सुनिल पाटील) । बुलंद पोलिस टाइम्सच्या सहसंपादकपदी बुध्दप्रिया धोंडीराम पगारे यांची गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली होती. या ३१ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने, त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
दरम्यानच्या काळात त्यांच्याकडे अजूनही बुलंद पोलीस टाइम्स संबंधित ओळखपत्र व इतर कागदपत्रे आहेत. मात्र कार्यमुक्त झाल्यानंतर त्यांनी सदर कागदपत्रे व ओळखपत्र परत केलेले नाही. या कागदपत्रांचा व ओळखपत्राचा वापर करतांना त्या आढळल्यास संबंधितांनी त्याची तात्काळ दखल घेत बुलंद पोलिस टाइम्सला कळवावे. तसेच या ओळखपत्राचा गैरवापर केल्यास होणा-या कायदेशीर कारवाईला त्या स्वतः जबाबदार असतील. बुलंद पोलिस टाइम्सच्या नावे यापुढे त्यांनी केलेला कोणताही आर्थिक व्यवहारास बुलंद पोलिस टाइम्स जबाबदार नसेल, असे बुलंद पोलिस टाइम्सचे मुख्य संपादक सुनिल पाटील यांनी कळविले आहे. 







