पतीकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून २ लेकरांसह आईनं मृत्यूला कवटाळलं

मृत्यूला कवटाळलं

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) । गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक कलहामुळे दारूच्या नशेत पतीकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला महिला कंटाळली होती. त्यामुलेच ३० वर्षांच्या महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.

घरगुती कलह आणि मानसिक छळामुळे निराश झालेल्या आई भाग्यश्री जाधव हिला दोन मुलांसह जीवन संपवण्याची वेळ पतीमुळे आली. पोलिसांनी पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. राजू जाधव असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या पाबळ गावातील ३० वर्षांची भाग्यश्री राजू जाधव आणि तिचे दोन्ही लहान मुले विहिरीतून मृत अवस्थेत आढळले. प्रारंभिक माहिती नुसार, पतीकडून सतत होणाऱ्या मानसिक त्रास व तणावामुळे ती या गंभीर निर्णयाकडे वळाली असावी, अशी प्राथमिक शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. सकाळी महिला आपल्या दोन मुलांसह घरातून बाहेर गेली. अनेक तासांनी तिची आणि मुलांची पत्नी/आई परत न आल्याने तिच्या पतीने शोध सुरू केला. शोधकार्यादरम्यान, गावातील एका शेतकऱ्यांची विहीर तपासली असता मुलगी विहिरीत तरंगताना आढळली आणि लगेचच स्थानिक लोकांनी शोध सुरू ठेवला. त्यानंतर महिला व ५ वर्षांचा मुलगा सुद्धा विहिरीच्या आत मृत अवस्थेत सापडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here