७० वर्षीय वृध्दाने चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुकलीवर केला अत्याचार

teacher-rape-on-minor-girl

बीड (प्रतिनिधी) । जिल्ह्यातील धारूर तालुक्यात दिंद्रुड परिसरात चॉकलेटचे आमिष दाखवून ७० वर्षीय वृद्धाने ९ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

धारूर तालुक्यातील एका गावात शेतमजुरी करून उपजीविका करणारे कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील नऊ वर्षांची मुलगी इयत्ता चौथी मध्ये शिक्षण घेत आहे. २८ जानेवारीला सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून ती निघाली होती. शाळेत जाण्यापूर्वी ती रस्त्यात एक मैत्रिणीला भेटण्यासाठी थांबली तेव्हा गावातल्याच बाबुराव केरबा निरडे या ७० वर्षीय वृद्ध आरोपीने तिला चॉकलेट देतो असे आमिष दाखवले.
आरोपीने चिमुकलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेतले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपीने तिला बाहेर सोडले. त्यानंतर ती शाळेत गेली होती. मात्र शाळेतून घरी परतल्यानंतर चिमुलीच्या वर्तनात अचानक बदल झाल्याचे तिच्या आईला लक्षात आले. चिमुकलीसोबत घडलेल्या सगळ्या प्रकरणाने ती अत्यंत शांत, घाबरलेली आणि अस्वस्थ दिसत होती.
आईने तिला विश्वासात घेतले आणि विचारणा केली. तेव्हा बालिकेने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आईला सांगितला. यांनतर आईने तात्काळ दिंद्रुड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी बाबुराव केरबा निरडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने कारवाई करत आरोपीला अंबाजोगाई येथून अटक केली.
पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here