लातूर (प्रतिनिधी) । शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मध्यरात्री दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीमुळे एका तरुणावर चाकूने वार करत हल्ला करण्यात आला. या घटनेने काही काळ वाहतूकही खोळंबली होती.
या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चौकातील रहदारीच्या ठिकाणी दोन गटांमध्ये अचानक वाद झाला. आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत प्रज्वल मस्के (वय २२) याला जबर मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर चाकूने वार देखील करण्यात आला. याच वेळी घटनास्थळावरून लातूरचे आमदार अमित देशमुख जात असताना त्यांनी ही परिस्थिती पाहिली. त्यांनी तत्काळ मदत करत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली आहे.
उपचार सुरु असतांना प्रज्वल मस्के याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या घटनेतील आरोपींचा आरोप केला आहे. हा वाद नेमका कश्यामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहे.







